STORYMIRROR

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

3  

Smita Bhoskar Chidrawar

Inspirational

माझे गुरू...

माझे गुरू...

1 min
237

आई असते पहिली गुरू ...

जिची शिकवणी अगदी असते शेवटपर्यंत सुरू...


आपला गाईड नेहेमी सोबत असणारा ..

कुठल्याही समस्येचा तोडगा नक्की देणारा...


तिच्या कुशीत शिरायला ना वेळ काळाचे लागते बंधन ..

तिच्या मार्गदर्शनाने ने सोपे होते जीवन...


मग जीवनाच्या वाटेवर भेटत जातात अनेक गुरू ...

बाबा , दादा ,ताई लहान भावंडांची शिकवणीही होते सुरू ....


शिक्षक तर अनेक असतात द्यायला शिक्षणाचा आधार ..

सोबतच देतात अनेक चांगले विचार ...


मोठा शिक्षक तर नेहेमी असतो आपला सखा सोबती .

मित्र मैत्रिणी , सखे सोबती आणि काही विशेष नाती ..


मुलीसाठी तर सासर हे मोठेच ठरते गुरुस्थानी...

सगळेच काहीतरी शिकवून जातात प्रत्येक क्षणी...


निसर्ग तर नेहेमीचा सोबती ...

पावलोपावली घडवतो गुरुवत नेहेमी...


सगळ्यात मोठं स्थान आहे आपल्या काळजाच्या तुकड्याचं ..

कारण सगळ्यात मोठं शहाणपण मिळतं आई होण्यातून...


माझ्या जीवनात अनेक वाटेवर भेटलेल्या माझ्या सगळ्या गुरूंना समर्पित !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational