माझे गुरू
माझे गुरू
गुरु विना कोण शिकवली
आम्हा अ आ इ ई ची भाषा
ठाऊक आहे फक्त आम्हांस
शिकवीताना काय झाली त्यांची दशा..
किती जरी त्यांना झाले त्रास
गुरुजींनी घेतली ना माघार
विद्यार्थ्यांना घडविण्याचा
जडला होता ना त्यांना आजार...
गावात ना वाहने, ना नीट रस्ते
ना बाळगली गुरूंनी अडचणींचा तमा
पोरांना नव्हती शाळेची आवड
घरा घरात घुसून ते पोरं करायची जमा
जेव्हा रचवली माझ्या गुरूंनी पाया
तेव्हा आम्ही उभा केलो कळस
महत्व कळता शिक्षणाचे आम्हा
कधी ना आली शिक्षणाची किळस....
असे होते आदरणीय गुरु माझे
करुन दिले शिक्षणाची जान
रुजले अंगी गुरुच्या आदर्शाने
जीवनात माझ्या संस्कारांची खाण...
माझ्या गुरुजनांचे मानते मी आभार
सदैव ठेवीन मी त्यांचे मान
देवाच्या स्थानी पूजते मी ज्यांनी
दिले मला शिक्षणाचे अनमोल दान.....
