STORYMIRROR

VINAYAK PATIL

Abstract Others

4  

VINAYAK PATIL

Abstract Others

माझे घर

माझे घर

1 min
363

मंद पहाटेला माझे घर माझ्याशी बोलते 

सर्व जुन्या आठवणी उजळून काढते 

घराच्या चार भिंतीत कुटुंब माझे वसते

कितीही मैलावर असलो तरी परतीची ओढ लागते 


आमच्या सर्वांची सुख दुःखे या घराने पाहिली 

खचलेल्या मना दिला आधार

अडीअडचणीला साथ मोलाची दिली 

पण कधी ना केले निराधार 


आमच्या उदासीने ते हि उदास होत असे 

हसत्या खेळत्या घरात का बरे असे घडे 

लहानांच्या उपस्थितीने घर बोलके होत असे

असे हे घर गिरवी संस्काराचे धडे 


या घराने झेलले अनेक पावसाळे

ओल्या भिंतीतून व्यक्त केले भावनांचे शहारे 

मायेने आम्हा सर्वांना कवटाळे 

कुटुंबियांच्या सुखासाठी दिले रात्रं दिवस पहारे 


बघता बघता दिस सरले 

पाखरे उडू लागली नव्या ठिकाणी 

घराचे घरपण हरवू लागले 

सोबत राहिल्या घराच्या जुन्या आठवणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract