STORYMIRROR

SANJAY SALVI

Abstract

4  

SANJAY SALVI

Abstract

माझे गाणे तुझे सूर …

माझे गाणे तुझे सूर …

1 min
458

बोलता बोलता मी तुझाशी शब्द काही पेरले,

डोळे तुझे पाणावले अन शब्दांना अंकुर फुटले,

स्पर्श लाभता तव अश्रूंचा शब्दांचे मोती झाले,

एक एक गुंफून मोती मी गीत तयांचे रचिले,

संगीताचा साज चढविता गीताचे गाणे झाले,

त्या गाण्याला तुझ्या गळ्यातील  सुवर्ण सूर लाभले,

तुझ्या सुरांनी रसिक जनांचे मन मोहित केले,

अन तदनंतर शब्दांना माझ्या अमरत्व प्राप्त झाले !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract