माझे बाबा
माझे बाबा
पदोपदी संकटात करी जिंकण्या संघर्ष
अंत पाहता जीवन माझा बापच आदर्श
त्याचा मला अभिमान माझे जगण्याचे बळ
आम्हासाठी तू पेटतो दिनरात तळमळ
आम्हासाठी झगडतो एक आभाळ पाताळ
शिकवितो तू प्रेमाने सद जीवन आभाळ
गर्व सदा आम्हा त्यांचे हात न फैलावे कदा
मेहनत ही कर्तव्य दूर लाचारी आपदा
दिनरात मेहनत जीवनात दिले रूप
देवा मागणे चरण सेवा करण्या स्वरूप
