माझे बाबा
माझे बाबा
अपरिमित कष्ट करणारे
स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणारे....माझे बाबा
काटकसर करणारे आणि करायला शिकवणारे
भविष्यासाठी गुंतवणूक करायला शिकवणारे...माझे बाबा
लहानपणी भावांचे वडील बनून त्यांना घास भरवणारे
कितीही त्रास झाला तरी सारं काही सोसणारे.... माझे बाबा
अंतःकरण प्रेमाने तुडुंब भरलेले असणारे
कधीही ते व्यक्त न करणारे...माझे बाबा
आमचे सर्व हट्ट पुरवणारे
प्रसंगी न मागताही सर्व देणारे...माझे बाबा
लेखन, वाचन याचा वारसा देणारे
प्रेरणादायी कौतुक करणारे...माझे बाबा
