STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance

माझा सखा

माझा सखा

1 min
353

सख्या जेव्हा तू येशील ना मला भेटायला,

त्या चंद्राला ही मी थांबवून ठेवेन.

बघ म्हणेन माझा चंद्र किती आहे सुंदर!

लोकांना तुझ्यात त्याचं प्रेम म्हणे दिसत.

माझ प्रेम बघ माझ्या सख्याच्या डोळ्यात वसत.

बघ ना डोळ्यात त्याच्या दिसेल तुला ही,

सागराची गहराई अन् नभाची निळाई.

काय पाहतात रे लोक तुझ्यात,?

तूझ्यावर तर डाग पण माझा सखा बघ बेदाग.

 तू लपतो ढगा आड़ वाट पाहायला लावतो.

 सखा माझा मात्र माझ्या आसपासच असतो.

 का करू मी तुझ्यावर कविता का गाऊ तुझे गोडवे?

 माझ्या सख्याकड़चा एक तरी गुण आहे का तुझ्याकड़े?

असा कसा हा चंद्र बघ कसा हिरमुसला.

सख्या तुला पाहून तो ढगाआड लपला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract