Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendrakumar Shelke

Inspirational

4.0  

Rajendrakumar Shelke

Inspirational

माझा राजा शिवाजी!

माझा राजा शिवाजी!

1 min
185


एक पेटता दिवा *पाहिजे,*

महाराष्ट्राच्या मातीला आज

पुन्हा एकदा शिवा *पाहिजे.*


मुघलांच्या अन्यायाला 

तोडणारा बंदा *पाहिजे,*

 दिन दलितांचा कैवारी

दृष्टांचा संहारी *पाहिजे.*


आई जिजाऊच्या पोटी

माझा राजा *जन्मला,*

शिवनेरीवर सह्याद्रीचा

शिवमय भगवा *फडकला.*


रयतेचे दुःख आपले माणुनी

मनावर अधिराज्य *केले,*

एक जाणता राजा म्हणून

साऱ्या विश्वात महान *ठरले.*


सह्याद्रीच्या कडेकपारी

एकच नारा *घुमला,*

हर हर महादेव म्हणत

मराठी भगवा *फडकला.*

 

करारी बाणा,भेदक नजर

सुर्यनारायण करी *नमन,*

सह्याद्रीच्या या छाव्याला

मनोमनी करावे *वंदन.*


किती वर्णावी महती त्यांची

जाणता राजा ऐसा *नाही,*

झाले गेले कित्येक राजे इथे

पण शिवबा सारखा होणे *नाही.*


 गरुड भरारी झेप ज्यांची

 मर्दानी चाल सिंहाची *जशी,*

स्त्री सन्मान करूनी सदा

केले दोन हात *शत्रूशी*.


ते राजा जगती महान

आहे जाणता राजा *आज,*

करू या वंदन त्यांना ते 

छत्रपती शिवाजी *महाराज*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational