माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
1 min
36
पावनभूमी ही महाराष्ट्राची
महाराष्ट्र माझा महान,
संत-महंतांची भूमी खरी
संस्कारांची ही खाण
शूर शिवबांचा पराक्रम
या मातीने पाहीला,
सह्याद्रीचा कडा गर्जतो
नमन महाराष्ट्र भूला
संस्कृतीचा महान महीमा
महान असे संतवाणी,
गड-किल्ले साक्षी देती
हृदयी कोरली लेणी
कृष्णा, गोदावरी, भिमा
करीती सुजलाम, सुफलाम,
मळे पिकती सोन्याचे
मातीत गाळूनी घाम
कोकण सजला, नटला
मुंबई राजधानी छान,
माझा महाराष्ट्र महान
मज वाटे अभिमान