STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational Others

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Inspirational Others

माझा महाराष्ट्र...

माझा महाराष्ट्र...

1 min
89

पावन भूमी ही महाराष्ट्राची

महाराष्ट्र माझा महान,

संत-महंतांची भूमी खरी

संस्कारांची ही खाण


शूर शिवबांचा पराक्रम

या मातीने पाहिला,

सह्याद्रीचा कडा गर्जतो

नमन महाराष्ट्र भूला


संस्कृतीचा महान महीमा

महान असे संतवाणी,

गड-किल्ले साक्षी देती

हृदयी कोरली लेणी


कृष्णा, गोदावरी, भिमा

करीती सुजलाम, सुफलाम,

मळे पिकती सोन्याचे

मातीत गाळूनी घाम


कोकण सजला, नटला

मुंबई राजधानी छान,

माझा महाराष्ट्र महान

मज वाटे अभिमान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational