माझा महान भारत..
माझा महान भारत..


पुलवामा भ्याड हल्ला
घेऊ बदला हल्ल्याचा,
पाकड्यांना दावू आता
पराक्रम भारताचा.
आतंक्यांचा करू खात्मा
करू उध्वस्त अड्डे ते ,
वीर जवानांची आम्हा
आठवण खूप येते.
प्राण अर्पिले विरांनी
आम्हा विरांची प्रेरणा,
पाक करू उध्वस्त रे
श्रध्दांजली ती विरांना.
आग पेटली चित्तेची
आग सर्वांच्या मनात,
करू पाकवर हल्ला
करु नष्टच क्षणात.
व्यर्थ न हो बलिदान
सारे शपथ घेऊ या,
आतंक्यांना संपवून
चला अमर होऊ या.
किती राखावा संयम
किती दयावा बलिदान,
काटा काढू कायमचा
करु नष्ट पाकिस्तान.
देशासाठी जगु मरु
करु दुष्टावर मात,
जगी आहे हा महान
माझा महान भारत..!