STORYMIRROR

Surekha Rajput

Inspirational

3  

Surekha Rajput

Inspirational

माहेर

माहेर

1 min
126

सई ,आठवता ग मला माहेरवास

भुलूनिया जातो सारा सासरवास


माझं ग माहेर तीन वेशीच गाव

होता आठव सैरभैर घेई ग धाव


गाडी उभी दारात चैन पडेना मनाला

रव घुंगुरवाळ्याचा भूल पडे ग जीवाला


माहेरच्या ग वाटे वाहे आल्हाद गारवा

माईच्या ग कुशीत लाभे स्वर्गीय विसावा


घेऊनी भाकरतुकडा उभी दारात माय

झरझर उतरावून म्हणे ये ग माझी बाय


पंचमीचा झोका ,फेर,झिम्मा फुगडी

बंधुराया आणी मला नक्षीची ग लुगडी


पडवीत मांडला काचकवड्याचा ग डाव

ताईवन्सना बाई माहेरी मिळे भारीच भाव


माझ्या ग माहेरी लई मोठाल्या पेठा

बापाचा माझ्या चिरेबंदी वाडा मोठा


आठवणीचा पूर दुथडी भरूनी वाहते

खोल गेलेली मुळ काळीज ग छेदते


दुनियादारी फिरले माहेराची नाही सर

माहेराची शिदोरी जपेन ग आयुष्यभर


होता कातरवेळ लागली हुरहुर मनाला

कवा येईल साजन मला ग बाई न्यायला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational