STORYMIRROR

Surekha Rajput

Others

4  

Surekha Rajput

Others

चारोळ्या

चारोळ्या

1 min
568

 "खट्याळ मुरलीधरा

    राधा झाली रे वेडी

    गोपगोपिका वैतागे

   काढू नको रे खोडी". 1


 "पंढरीच्या वाटे दरवळे

  गुलाल बुक्याचा गंध

 लहान थोर वारकरी

झाले विठ्ठल भजनात दंग".2


"कुंकवाचा टिळा

शोभे नभी

 नेसूनी हिरवा शालू

धरती माता उभी" 3


मातेच्या कुशीत वाढली

 अजाण सारी बाळे

पायात घातली

नात्यांची घुंगूर वाळे" 4


"आठवले रम्य ते बालपण

 गुंफल्या आठवणीच्या माळा

 बांधले अतुट प्रेम क्षण

जमे गणगोतांचा मेळा" 5


Rate this content
Log in