तुमच्यासाठी
तुमच्यासाठी
1 min
381
माझी स्मरणिका
मीच वाचत होते
माझं जगणं
फक्त तुमच्यासाठी
जगत होते
कधी नदी होऊन
वाहून घेत होते
काटेकुटे तुडवित
विसावण्या मिठीत
सागरा
धडपडत होते
पण
सागराने अस्तित्व संपवलं
माझी स्मरणिका
मीच वाचतं होते
माझं जगणं
फक्त तुमचासाठी
पावसाच्या सरीसाठी
चातकासारखी
तडफडत होते
पण
पावसाने मात्र
पूर्णतः झोडपलं
तिथे ही मी स्वतःला विसरले
माझी स्मरणिका
मीच वाचत होते
माझं जगणं
फक्त तुमच्यासाठी
प्रकाशासाठी
पंतगासारखी दिव्याभोवती
घिरट्या घालत होते
पण तिथे ही
दाहकतेने जाळून
खाक झाले
फक्त
अन्
फक्त तुमच्यासाठी
