STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

मायमाऊली

मायमाऊली

1 min
212

अबोल,सोशीक,सहनशील

पदव्या केल्या बहाल


मानेवर जू,ओढी संसार रथ

मनीस्वप्न ना कसले मनोरथ


दिन ना रात्र घेणे ना देणे

हर दिनाचे माप सम ठेवणे


मनी झुरते ,

राबराबते


ओठी ना शब्द चकार

कधी ना संताप अंगार


सोनेरी कुलूपात बंद तुज भावना

सर्वच तुझ्या निराळ्या कल्पना


मानाने तू जोडीदारीण

कामाला ग तू मोलकरीण


प्रेमाच्या शब्दास्तव पाय थांबे उंबऱ्यात

खानदानी लेक शोभे सासरच्या घरात


संस्कार मायीचे,शब्द जीभ कापते

नजर जमीनीवर माती भिजते


मार्दवता नजरेत

करारीपणा नजरेत

 

कपाळभर मळवट,धाक न्यारा

डोईवर पदर,रूप गहिरा


परमेश्वराची तू माऊली

सदैव त्यांची कृपा सावली


ओळख तुझ्या अंतरीचे भाव

ओठी मायमाऊली तुझे नाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन