STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

मैत्रीसाठी

मैत्रीसाठी

1 min
431

खूप खूप वाटतं

सखे

भेटावं बोलावं

परत एकदा लहान व्हावं

सगळं सगळं विसरावं

अन्

बालपणाच्या कुशीत शिरावं

खेळ खेळावं

कट्टीबट्टीचा

आठवणीचा लगोर रचावं

बेभान होऊन

चेंडू मारावं

खूपदा वाटतं सखे

अजाणता,निरागसतेची

पट्टी बांधावी

डोळ्याला

अन्

जुन्या आठवणींची 

आंधळी कोशिंबीर खेळावी

अन् 

चूकून का होईना

पण आपल्या

आठवणीच्या छायेला

घट्ट मिठ्ठी मारावी

खूपदा वाटतं 

सखे

रम्य आठवणीत रमून जावं

हूंदडावं खिदळावं नाचावं बागडावं

मनसोक्त जगावं

फक्त

अन्

फक्त मैत्रीसाठी


Rate this content
Log in