STORYMIRROR

Surekha Rajput

Others

3  

Surekha Rajput

Others

जग हाताळती हात

जग हाताळती हात

1 min
364

हात दोन तिन्ही लोक हाताळती

खरेखोटे,भलेबुरे मार्ग चोखळती


एक हात पुण्य करी

दुजा हात पाप करी


धर्म सांगे एक हात, दुजा धरी हत्यार

कल्याणासाठी करी मानवाचा संहार


रक्ताळलेले हात,डागाळलेले हात

स्वार्थासातव गुंफती एकात एक हात


हात माहेरचा अन् हात सासरचा

मेळ नाही बसला दोन ध्रुवाचा


दुःखितांचे अश्रु पुसण्या हात जे राबती

सद्भावे तत्वचरणी हात जोडती


सर्व जग हाताळती हात

जग हाताळती हात


साहित्याला गुण द्या
लॉग इन