माघारी
माघारी
भेटत तर नव्हतो कधीच, आता पाहताही येत नाही.
तुझा विचार करायचा सोडून, काही करता ही येत नाही.
फार वेळ गेला नाही, पण बदलली असशील.
फार फार तर काय, आणखी सुंदर दिसशील.
नट्टा थट्टा नसेल काही, तरी विलक्षण चमकशील.
मी पहायला आलो की, नेमकी तेव्हाच तिथे नसशील.
फसतील कैक प्रयत्न माझे, पण समाधानी असेल.
नजरेत काहूर माजेल, अन मन स्थिर नसेल.
कधी तरी यश मिळेल, अलगद असे पाहिन.
दिवसाच्या उन्हात, चक्क चांदण्यात न्हाईन.
मला अचानक पाहून, लल्लाटी घड्या घालशील.
हळूच हसून दिसण्या पूर्ण, दाराशी धावशील.
मी मात्र स्वतःला लपवताना, लख्ख उघडा पडेल.
पुन्हा अनोळखी भासवत, नजर एकमेका भिडेल.
मी पुन्हा सुन्न निसुन्न, माघारी परतेल.
कधी ना कधी ही गोष्ट, सत्यात उतरेल.
