म - मातीचा मेघराजा
म - मातीचा मेघराजा
मोक्ष मिळावा मेघराजा
थकला रे बळीराजा
ढेसाळ भूमीत सोन पिकवल
पाऊसाने सार मरून गेलं.
तू तर उधार करता
तू निसर्गाचा रचिता
खुलून जाई दाही दिशा
बघताच शहनभर
हिरवळीची परिभाषा
माय धर्तीचे चाकर देवा
मिळेना नशिबाची भाकर देवा
लोटून नेहेले स्वप्न सारे
पाण्यामध्ये विसर्जित झाले
पदरी आता दुःख उरले
गरिबीचा शिक्का माथ्यावर
पोटतिडक लाचारी हातांवर
पेलताना कारभार खांद्यावर
मोक्ष मिळावा देवराजा
थकला रे बळीराजा
