लता
लता
कंपायमान झाले अवघेच सूर आता,
जाता लता सुरीली गेलाय नूर आता!
आबाल वृद्ध सारे होते असे दिवाणे,
तो सूर मूक झाला अन् हुरहूर आता!
तपसाधना सुरांची आजन्म थोर केली,
तो जाळ शांत झाला नशिबात धूर आता!
दिसणार ना अता ती घेऊन देव गेला,
कोकीळकंठ गेला सोडून दूर आता!
मंगेश ईश सारे भक्तीत गायले तू,
वंदन तुला लतादी नयनात पूर आता!
