लपंडाव
लपंडाव
दुःखाचा सुखाशी...
निराशेचा आशेशी,
अश्रूंचा हास्याशी
असतो लपंडाव !
दुराचाराचा सदाचाराला...
अपमानाचा स्वाभिमाना,
अंधश्रद्धेचा श्रद्धेला
नमवण्याचा प्रकार !
करू की नको अन्..
लोक काय म्हणतील ?
विचारांची ही मुरड
लपंडाव खेळतील !
पण नाही मी झुकणार...
पारंगत होणार,
भावनांना वश करत
मीच लपंडाव जिंकणार !