लॉकडाऊन
लॉकडाऊन
लॉकडाऊन पडला
मन कासावीस झाला
पुढे काय हा प्रश्न
माझ्यासहित देशालाही पडला
धावपळीच्या जीवनाला
जोराने ब्रेक लागला
घरात कसे वागावे
कळेना घाबऱ्या मनाला
टीव्ही बघून बोर झाले
पत्ते कॅरम नकोसे झाले
अडगळीतले फोटो बाहेर पडले
आठवणींना वाटाही फुटले
रोज रोज नवीन पदार्थ
टेस्ट करताना येई मजा
कसे सांगू हिला
मिळे आम्हा भयंकर सजा
असा हा लॉकडाऊन
खरंच नकोसा झाला
बळजबरीची सुट्टी
देवा देऊ नको मला
