लहानपण - एक आठवण
लहानपण - एक आठवण
एक काळ असा होता,की आमचा काही हट्ट होता
कोणी काही बोललं तरी बाणा निगरगट्ट होता
अगदी च ऐकले नाही तर आई बाबांचा रट्टा होता
गप्पा ठोकायला छानसा कट्टा होता ||१||
आता मात्र जमत नाही जमले तरी चालवत नाही,
कट्टयावर कोणी भेटत नाही ,कारण आम्ही मोठे झालो
कारण आम्ही मोठे झालो ||२||
जबाबदारीचे भान आले, चार पैसे कमावण्यासाठी जीवाचे रान केले
चिल्ल्या पिल्ल्यांसाठी काबाड कष्ट केले
चिल्ले पिल्ले मोठे होवुन साहेबांच्या देशात गेले ||३||
विटी दांडू ,लिंगोरच्या, डब्बा ऐसपैस,
सगळ्याचा आनंद परत घेता येवू दे
देवा माझे लहानपण स्वप्नापरीस मला डोळे भरून पाहू दे
डोळे भरून पाहू दे ||४||
