STORYMIRROR

Shubhangi Belgaonkar

Others

3  

Shubhangi Belgaonkar

Others

गुढीची गाठी

गुढीची गाठी

1 min
182

ती म्हणाली, आली ही शिष्ट

दुसरी म्हणाली अरे ही तर गर्विष्ठ

नाही ग ही तर कनिष्ठ

मग आली एक मोठ्या उत्साहाने

आनंदाने हिरीरीने, दिमाखाने, डौलाने

म्हणाली काय आहे इथे येण्याचं तुमचे उदिष्ट

सगळ्यांनी कसे मिळून मिसळून राहायचे

नाही कोणी कोणाला हिणवायचे

एक संध ,एकात्म, संस्कृती जपायचे

कोण म्हणून काय विचारता

ती तर आमची लाडकी भाषा मराठी

जणु आमच्या गुढीची गाठी

आमच्या पिढीला वाचविणारी काठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन