STORYMIRROR

Shubhangi Belgaonkar

Others

3  

Shubhangi Belgaonkar

Others

मोबाईल देवा

मोबाईल देवा

1 min
119

जयदेव जयदेव जय मोबाईल देवा

बाई सारखा आम्हाला अभ्यास शिकवावा!


ऑनलाईन शाळा सुरू होता घरी!

विजेचा लपंडाव त्रास देतो भारी!

"झूम" वर हजेरी आमची लागते जरी!

सवांगड्याची भेट होत नाही खरी!!१!!

जयदेव जयदेव....


पर्यावरणातील झाडे रानात रहाती!

फुल पाखरे त्यावर रुंजी घालती!

आम्हाला मात्र घरात बसण्याची सक्ती!

कोरोनाला आम्ही घाबरलो किती!!२!!

जयदेव जयदेव.......


विज्ञानाने केली मोठी प्रगती!

पण कोरोनाची लस येणार कधी?

शाळेत जाण्याला आम्ही आतुरलो किती!

समजून घ्या देवा आमची बिकट स्थिती!

जयदेव जयदेव.....


Rate this content
Log in