STORYMIRROR

Shubhangi Belgaonkar

Others

3  

Shubhangi Belgaonkar

Others

कोरोनाला हद्दपार करू

कोरोनाला हद्दपार करू

1 min
248

हातात घेवुन सॅनिटायझरची बाटली

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली||

पहिल्या रोगाचे मुळ ही दारू |

घरा घरातुन तिला हाकारू |

दारूपायी प्रजा ही सारी बिथरली |

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली ||१||


दुसऱ्या रोगाचे मुळ तंबाखू |

गुटखा,गांजा, चरस नि अफु |

व्यसनापायी नितीमत्ता ही खालावली |

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली ||२||


तिसरा रोगांचा दादा हा आला |

‘करोना’ म्हणती जन हि त्याला |

सारी कडे यान गोंधळ मांडीला |

रुपान याच्या मंडळी सारी घाबरली |

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली ||३||


रोगावरी ना या औषध उपचार |

नका फिरू कोणी उगा बाहेर |

स्वैराचारन पिढी ही सारी बिघडली |

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली ||४||


पिडीतांना देवु खरा आधार |

‘करोनाला’ आता करू हद्दपार |

सर्वांनी करूया हा निर्धार |

वाड्या वस्त्यांना स्वच्छता शिकवू या चांगली |

रोगा रोगांचे उच्चाटन कराया निघाली ||५||


Rate this content
Log in