STORYMIRROR

Shubhangi Belgaonkar

Others

3  

Shubhangi Belgaonkar

Others

"चल ग सखे जगरणाला"

"चल ग सखे जगरणाला"

1 min
164

चल ग सखे जागरणाला चल ग सखे,चल ग सखे जागरणाला 

 पर्यावरण पर्यावरण रक्षणाला..............ll ध्रु ll

 तू ध्यानी जरा ठेव हो हो हो...

 तू ध्यानी जरा ठेव निसर्ग हाच आपुला देव

 करूया जतन एक एक वृक्षाला..ll१ll


गोदावरीच्या नदी तीरावर, नाशिक शहर वसले सुंदर,

दूषित पाण्याने झाले बेजार, वरचेवर होती सर्वा आजार

तुम्ही आवरा स्वतःला हो हो हो...

तुम्ही आवरा स्वतःला, तुम्ही सावरा गोदेला.

सारे मिळून वाचवू वसुंधरेला ll२ll


घातक वायुंनी भरले आभाळ, शुद्ध हवा झाली दुर्मिळ,

कारखान्यांनी यांनी पसरली भेसळ, ठेवा हे वातावरण निर्मळ.

नका गाड्या वापरू चार हो हो हो....

नका गाड्या वापरू चार, ठेवा दूर श्वसनविकार.

नसे पर्याय दुसरा हो सायकल ला ll३ll


कापडी पिशव्यांचा करा वापर, कागदी पिशव्यांचा करा वापर,

कॅरी बॅग ला तुम्ही द्या नकार, जनावरा होई त्यांचा ताप,

गोदेकाठी नको हे महापाप, गोदेकाठी नको हे महापाप, धरा स्वच्छतेची आस हो हो हो ...

साधू सर्वांचा विकास, प्रगती पथावर नेऊ नाशिक नगरीला ll४ll


Rate this content
Log in