मर्द (विडंबन कविता)
मर्द (विडंबन कविता)
अभिताभ चा मर्द पाहून एक टांगेवला बावळा |
गल्ली मधल्या रुबी वरती प्रेम करू लागला ||
कधी नळावर कधी रस्त्यावर, फिरे सदा मागे |
ब्रम्हचारी तो जुळवू पाही प्रेमाचे धागे ||
दूरध्वनीवर ,भ्रमणध्वनीवर नेहेमी पडलेला दिसे |
स्टेटस आणि प्रोफाईल म्हणे त्याची कायम अपडेट असे ||
तिच्या साठी स्वारी त्याची सतत झुरत असे |
तिला मात्र याची काही कल्पनाही नसे ||
याची भणभण थोडी कुणकुण घरी तिच्या लागली |
टांगेवाल्याची त्यांनी चामडीच सोलुन काढली ||
जखमी इतका झाला तरी स्वप्नं तिचीच पाहत होता |
“मर्द को कभी दर्द नही होता” एक सारखे हे म्हणत होता ||
