STORYMIRROR

Shubhangi Belgaonkar

Children

3  

Shubhangi Belgaonkar

Children

ऑनलाइन शाळा

ऑनलाइन शाळा

1 min
246

नको पाटी दप्तर नको खडू फळा

ऑनलाइन शाळा आता ऑनलाइन शाळा

जेंव्हा पासून पडला आहे शाळेला टाळा

आई बाबा म्हणतात जरा मोबाईल घेरे बाळा

ऑनलाइन शाळा आता ऑनलाइन शाळा ||१||


नेट करा चेक उघडा कॅमेराचा डोळा

लाईट गेले मधेच तर पोटात येतो गोळा ||२||


कशी होणार आता आमची ऑनलाइन शाळा

खिडकीतूनच मैदान पहा आणि ऑनलाइन खेळा

पडलो चुकून बाहेर तर आहे पोलिसांचा डोळा

ऑनलाइन शाळा आता ऑनलाइन शाळा ||३||


संपला वर्गाचा शिष्टाचार आता स्क्रीनचे ऐटिकेटस् पाळा

ऑनलाइन शाळा आता ऑनलाइन शाळा ||४||


स्क्रीनकडे बघून दुखतो एक एक डोळा

ऑनलाइन शाळेचा आता आला कंटाळा

ऑनलाइन शाळा आता ऑनलाइन शाळा ||५||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children