STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Inspirational Others

4  

vaishali vartak

Abstract Inspirational Others

लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा

1 min
299

वाटते रहावे लहानरम्य

असते बालपण सदा

बागडत रहावे

चिंतेची सदा बोळवण

खेळ खेळा दिनभराते

सारे मिळणार

हातात लाड करीती

येता जाता नसते

काळजी मनात

बालपण काळ सुखाचा

काळजी चिंता ती मोठ्यांना

बालके खेळण्यात मग्न

नसे कल्पना लहानांना


जशी पाखरे विहरती

नसे चिंता कशाची जया

तैसे विहरती बालके

नसे तमा कधीच तया

उगाची घेतले आशीष

मिळवण्या हे मोठे पण

आता छळे जवाबदारी 

परत देना बालपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract