लग्नाचं आलं फितूर
लग्नाचं आलं फितूर
लग्नाचं वाजलं बिगूर,
स्थळांची रेलचेल करु
स्वप्ने उद्याची बाळगता
लग्नाचा बाजार सुरु
घटली मुलीची संख्या
वरपक्ष जास्तच लागले भटकू
मुलगा उतावळा गुडघ्याला बाशिंग
ज्याला त्याला लग्न लागले खटकू
खरेदी विक्रीचा प्रकार वाढला
लग्नाच्या नावाखाली हा खेळ मांडला
नारीचं नारीत्व लागतं घ्यावं विकत
स्त्रीभ्रूणहत्येच्या कारणाने समाज पिछाडला
मुलीची वाटतं होती लाज
जन्मापूर्वीच देत होता तिला मात
समाजातील पाताळी आपण खालावली
आता फिरतात परजातीची मुली पाहत
करा पुन्हा विचार आता तरी
द्या नारीला सन्मान जगापरी
पोरगा वा पोरगी हा भेद नको
स्त्रीभ्रूणहत्या बंद प्रत्येक घरोघरी
