लग्न (सहाक्षरी)
लग्न (सहाक्षरी)
रेशीम त्या गाठी
फेऱ्यात जुळल्या
स्वप्नांच्या जगाला
जशा उमलल्या
संसाराचे जग
परिपूर्ण व्हावे
तुझ्याच साथीत
पूर्णत्वास जावे
मिठीत तुझ्याच
दिवस तो नवा
जणू क्षण असा
आपला भासावा
लग्न नसतेच
फक्त घेणे फेरे
त्यात सप्तरंगी
रंग नवे सारे

