STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Inspirational

5.0  

गोविंद ठोंबरे

Inspirational

लेखणी

लेखणी

1 min
15K


तू ज्वलंत आहेस, अधीरही आहेस

आसूड उगारून नराधमांचे रक्त पिण्यास


तू बुलंद आहेस, दैदीप्यमानही आहेस

ताठ मानेने त्यांचे उर फाडून फेकण्यास


तू क्रांती आहेस, उत्क्रांतीही आहेस

बधीर मनाच्या माणसाला खडबडून जागं करण्यास


तू पर्व आहेस, नवपर्वही आहेस

युगायुगाचे भाकीत वर्तमानात लिहीण्यास


तू इतिहास आहेस, अभ्यासही आहेस

खरे नि खोटे जगापुढे ठणकावून सांगण्यास


तू प्रहार आहेस, संहारही आहेस

असूर वृत्तीच्या असूरी विचारांची मस्तके भेदण्यास


तू विजयी आहे, दिग्विजयीही आहेस

पांढऱ्या बगळ्यांचे काळे तळवे मुळातून उखाडण्यास


तू लेखणी आहेस, विचारांची पैदासही आहेस

समाज बांधणीचं वारं नसानसात भिनवण्यास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational