लेखणी एक शस्त्र
लेखणी एक शस्त्र


शांत स्वभाव जरी माझा
अन्यायाला थारा नाही
ग्रहण असतं तात्पुरतं
सूर्याला झाकता येत नाही
कर्तव्यात माझ्या मी प्रामाणिक
निष्ठतेने करते साहित्य सेवा
माझे चारित्र्य जर कराल मलीन
मार्मिक लेखणीतून उत्तर देईन
माय मराठीसाठी झोकून दिले स्वतःला
संसार प्रपंच मी मागे सारला
बीज रुजवलं साहित्य सेवेचं
कार्य हाती घेतलं लेखणीचं