STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Romance

3  

.प्रमोद घाटोळ

Romance

लावण्यवती

लावण्यवती

1 min
484


ती शांतपणे अंधारात उभी होती

मी सारखा तिच्याकडे पाहत होतो  

माझी नजर भारावून गेली

पण दृष्टी मात्र हटेना


दिसायला अति सुंदर ती

तिच कोमल अन् गोजिरं रुप

श्वेत रंगी पातळ

खूप चमत्कारिक दिसलं


मी नवविचारांनी धुंद झालो

बाजूलाच अंधार होता

मी ही खूप चौकस होतो

त्यामुळे भुक्क अंधारातही ती दिसली


अन् माझ्या मनात ठसली

जणू आकाशातील स्वप्न परी

लावण्याची गुलाब कळी

मला तिनं बघीतल


अन् तिला भरली हुडहुडी

संधी पाहून ती नाचू लागली

मला बघून हसू लागली

पायी अंधार..मुखी प्रकाश


उजेडात हसू स्पष्ट दिसले

तिची नृत्यंगती आता मंदावली

हवेच्या छान झुळकेसह निघून गेली

मी अचंबित झालो

ती श्वेतरंगी मेणबत्ती होती !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance