लावणी,, सजले मी
लावणी,, सजले मी
तुम्ही चंद्र तुमची चांदनी
दिसते मी चमक दामिनी
माझे यौवन मद कामिनी
रात चांदनी ने हो नटली..
गंध मंदार बाग फुलदार बहरली..
राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...
कुरळ्या कुंतली जाई जुई
गालाची खळी लाजते थुई
इश्काचा लागला मज लळा
राया माझा प्रीतीनं बावळा...
मदन बाण भेदून काळजात रूजली..
राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...
आहे कामदेवाची मी रती
इश्कानं गुंगली माझी मती
माझे हाल या रंगमहाली
तुम्हासाठी सेज अंथरली..
यौवनाच्या मदन बाणाने घायाळ झाली...
राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...
गंधाळले माझे अंगअंग
श्वास सुगंधित संगसंग
तनामनात ज्वानीचा रंग
चोळी कशी झाली तंग
काया कस्तुरी चंदनाचा गंध घमघम...
राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...

