लाटा
लाटा
किनाऱ्यावर आपटत येती
दुरून एकटक बघती
किती तरंगे उमंगे
आपटती आनंदा संगे
रोजची सवय जरी
अगणित वजने भारी
अखंडित रेखा मिटती
भयानक लाटा उसळती
पसरून जलतरंग
आसमंत होई एकरंग
मधेच तटून थांबले
अलगद फवारे उडले
भरती ओहोटी होती
सिमटत लाटा परतती
