लालपरी
लालपरी
लालपरी ती बसली घरी
गावोगाव झाले रिते
स्टँडवर दिसेना सध्या
माणूस कंडक्टर अन् ड्रायव्हर ते,
संपावर गेली परी
दळणवळणाची वाढली दरी
खाजगी वाहने लुटतात,
चर्चा प्रत्येकांच्या घरोघरी
त्रस्त झाले जनजीवन,
किंमत कळली आता खरी,
जेव्हा संपावर गेली ती लालपरी
मागण्या होती न होती मान्य
पेटेना चूल कर्मचाऱ्यांच्या घरी,
हाल-अपेष्टा भोगण्यासाठी
सगळेच कसे तत्परी,
जीव वाचला जीव गेला
कुणास कशाचे न घेणे देणे,
सर्वसाधारण मनुष्य मात्र
मधल्या मध्येच सहन करी....
