STORYMIRROR

Smita Murali

Classics

3  

Smita Murali

Classics

लालपरी

लालपरी

1 min
618

रोज रोज आतुरतेने 

पाहावी जिची वाट

रस्त्यावरुन धावताना

भलताच तिचा थाट


लाल रंग शोभे अंगी

वाटे जणू लालपरी

रस्त्यावर अवतरावी

लाल रंगाची सुंदरी


थांब्यावर लालपरी 

प्रवाश्यांची घेते वर्दी

लालपरीत बसायला

जमते मोठी गर्दी 


लालपरीत बसायची

मजाच मजा मस्त

सर्वांनाच परवडते

सवारी ही स्वस्त 


अपंगांना होवू नये

चढण्या उतरण्या त्रास

वाहक करतो मदत

आरक्षित आसने खास


वाहक चालक दोघेही

करतात उत्तम सेवा

सुरक्षित प्रवास घडावा 

इच्छा हीच रे देवा!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics