लाजुनी हसणे
लाजुनी हसणे
लाजुनी हसणे तुझे ते आठवे अजुनी मला
आर्जवी बहाणे तुझे ते आठवे अजुनी मला
भेटलो चोरून दोघे त्या उन्हाने पाहिले
केशरी दिसणे तुझे ते आठवे अजुनी मला
चौकडे गावात पिकला झूठ अफवांचा मळा
उमलणे माझे तुझे ते आठवे अजुनी मला
दातात दाबून अंगुली, तू मला जे खुणविले
अंतरी झुरणे तुझे ते आठवे अजुनी मला
भेट घडली शेवटी ती आता मला नच आठवे
सोबती असणे तुझे ते आठवे अजुनी मला
मंतरलेले दिवस ते, तू फक्त डोळ्यांची लढाई
जिंकणे सहजी तुझे ते, आठवे अजुनी मला
उडुनी गेले रंग सारे, फूल गेले सुकुनी ते
पाकळ्या मिटल्या तरीही, गंध ये अजुनी मला

