लाडक्या मुलास
लाडक्या मुलास
रे माझ्या लाडक्या मुला
अविचार तू करू नकोस
प्रेमाच्या जाळ्यात तू सहज
अलगद ओढला जाऊ नकोस
आयुष्यातील सोनेरी क्षण
बरबाद असे करू नकोस
कर अभ्यास , गाठ ध्येय
विरंगुळ्यासाठी छंदात रमायला विसरू नको
जीवन आहे अनमोल,
त्याची वाट अशी तू लाऊ नकोस
कर कष्ट, जिज्ञासा अन् महत्त्वाकांक्षा, जिंकून जग तू
आयुष्याची , तारुण्याची, कास तू सोडू नको
स्वप्ने तू पाहा भली मोठी
सध्या करण्यासाठी कर प्रयत्न, मागे तू पडू नको
व्यसनाधीनता, अनिती, अन मोहाचे पाश,
मोडीत काढ, त्यांच्यात तू अडकू नकोस
मित्रांची सोबत हवी जीवनात
पण मित्र पारखून घ्यायला विसरू नकोस
चुकीच्या संगतीच्या नादी लागून
जीवन तुरुंगाच्या बेडीत अडकवू नकोस
स्वप्ने सध्या करण्यासाठी
जिद्द, चिकाटी, अभ्यासाची आस तू सोडू नकोस
पाऊल चूकीचे पडताना तू, क्षणभर थांब
आई बाबांच्या विचारांना तू असा विसरू नकोस
आई बाबांच्या संस्कारांना, अन् प्रेमाला असे
कमजोर, लाजिरवाणे तू बनवू नकोस
त्यांचं नाव गाजवयचं आहे तुला
नीतिमत्ता जागी ठेव, तू हे कधीच विसरू नकोस
घरादाराच्या, कुटुंबाच्या किती अपेक्षा तुजकडून,
राष्ट्राचे नाव मोठे करायचे, भान हे विसरू नकोस
अडचणींवर मात करून, सिद्ध कर स्वतः ला
दश दिशांत गाजवायचे नाव तुला, हे तू क्षणभरही विसरू नकोस
