कविता...
कविता...
शब्दांचीही दुनिया न्यारी
हर विषयाची गोष्ट भारी ...
भावभक्तीची कथा निराळी
त्यात रंगे कविता आगळी ...
आई वडील त्यागाची मुर्ती
शब्दांची भाषा , संस्कार पूर्ती ...
प्रेम भावना गीत निराळे
भावनेचे आरोह आगळे ....
चंद्र तारका विश्व वेगळे
सखे सोबती माझे सगळे
निसर्गात मी अशी रंगले
स्वप्नात स्वच्छंद विहरले ....