STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Inspirational

3  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

वृध्द अवस्थेतील प्रेम

वृध्द अवस्थेतील प्रेम

1 min
330

#SMboss#Task१


चूल अन् मूलं सांभाळताना,

संपलं अर्ध आयुष्य..

तारुण्यातील प्रेम सरताना,

बहरत आली वृद्ध अवस्था अगं..


कप बशी पकडताना बघवत नाही,

तुझ्या हाताला आलेली कापरं..

पण काय करू? 

तुझ्या हातच्या दोन घोट चहाचे घेऊनच,

माझ्या दिवसाची सुरुवात होते अगं..


अंगी पडल्या सुरकुत्या,

अन् केस झाले राखाडी.. 

पण काय करू?

आजही तुझ्या केसांत गजरा माळण्यात,

मला नेहमीच आनंद वाटतो अगं..


दात नाही म्हणून धरतेस,

ओठाखाली दाबुन हसू..

पण काय करू?

खळखळीत हास्याने येणारी 

चेहऱ्यावरची कांती पाहण्याचा,

मोह काही आवरत नाही अगं..


शेवटी एक काठीच असते,

दुसऱ्या काठीचा आधार..

उरलेलं आयुष्य जगावं,

एकमेकांचा हातात धरुनी हात..

कारण..

सात जन्माचा नसतो कुणालाच ठाव अगं..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational