STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

3  

Arun V Deshpande

Romance

कविता- सखे तुजला ..!

कविता- सखे तुजला ..!

1 min
13.7K


सुरेख परिसर भोवतालीचा

खुणावतो आहे सखे हा तुजला

मन येता बहरून प्रेमभावे

जवळी ये तू , साद देतो तुजला ….!


सुरेख परिसर भोवतालीचा

धरतीच्या मनोरम सुंदरतेचा

फुलुन आली खुलून आली बघ

बाग सारी ही ,साद देते तुजला ….!


जुळून येता दोन मने आपुली

नजरही सारी बदलून गेली

शब्द तुझा -शब्द माझा मनातला

आपोआप आता बघ समजला ……. !


सुरेख परिसर भोवतालीचा

जग स्वप्नीचे दाखवी हे तुजला

हरवून जाऊ दुनियेत आता

तू माझ्या अन मी तुझ्या सोबतीला ……. !



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance