कविता : पत्रकार
कविता : पत्रकार
सामाजिक आर्थिक विकासासाठी
चालना देते वृत्तपत्र
व्यवसायिक शिक्षणाची जोड
देण्याचे एक लोकतंत्र
लोकांना ज्ञानात्मक मार्गदर्शन
विचार जागृत होतात
समाज सुधारण्याची जबाबदारी
कठीण परिश्रम पत्रकार घेतात
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व
लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, इहवाद
सुधारण्याची तत्वे बरेच
भौतिकवाद, बुद्धीप्रमाण्यवाद
व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता
तत्वावर समाजाची पुनर्रचना
ज्ञानप्रसार, लोक जागृती
छाप /प्रभाव पाडते जीवनात
बुद्धीजीवी कार्यकुशल विश्वासू
प्रामाणिक पत्रकार असतात
जर त्यांची दख्खन घेतली
खेदही पत्रकार व्यक्त करतात
त्यांचे तटस्थ भाष्य करणे
सकारात्मक दिशा ते देतात
बातम्या गोळा करून
वृत्तपत्रात प्रसिद्ध करतात
केलेल्या कृती प्रक्रियेला
योग्य स्वरूप देतात
मजकूर ऑडिओ चित्राच्या स्वरूपात
माहिती संकलित करतात
घटना, तथ्य, कल्पना
परस्पर संवादाचा अहवाल
उत्पादन आणि वितरण
चालू घडामोडी ही पहाल
वृत्तपत्राचे नियमित लेखन
दररोजच्या बातम्याची खाण
समाज जीवनात पत्रकारांना
आहे खूप महत्त्वाचे स्थान...
