STORYMIRROR

Arun V Deshpande

Tragedy

4  

Arun V Deshpande

Tragedy

कविता- प्रलय

कविता- प्रलय

1 min
367


जीवनदायी असे जीवन हे

जल ही संपत्ती असे

पाऊस येतो नित्य नेमाने

रहाटगाडगे चालू असे..


निसर्गयोजने नुसार चालते

ऋतुमान साजरे असते

कधी हे बिघडून जाता

काय कसे,हे अनुभवले


ढगफुटी झाली सगळीकडे

पाणीच पाणी नजरेस पडे

आभाळ कोसळले निरंतर

पाऊस नव्हे तो प्रलय होता


नदी, नाले, ओढे, यांचे प्रवाह

माणसाने सोयीने वळविले

पाऊस पडला असा भयानक

त्याने तोंडचे पाणी पळविले


दैना केली पावसाने खुप

सारे पावसात वाहून गेले

पाऊस विक्राळ रुपातला

धडा मोठा शिकवून गेला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy