Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Nandini Menjoge

Inspirational Others

3  

Nandini Menjoge

Inspirational Others

कविता... बहरू लागली...

कविता... बहरू लागली...

1 min
223


मी हाक दिली तिने साथ दिली, 

रुसलेल्या मनाला अलगद मिठी दिली, 

प्रसंगाचा ठाव घेत हळूच फुलू लागली,

ती बहरू लागली ||


बंधन उरले नाही विषयांना,

कधी वाद कधी संवाद रंगताना, 

विचारांचे गांभिर्य दाखवू लागली, 

ती बहरू लागली ||


भावभावनांचा वेग आवरताना, 

विचारांना वळणदार मार्ग दाखवताना, 

सत्यतेचा अविरत प्रवास करू लागली, 

ती बहरू लागली ||


निसर्गाचा देखावा दाखवताना, 

भ्रमंतीची प्रतिकृती रेखाटताना,

संवर्धनाचा संदेश गिरवू लागली, 

ती बहरू लागली ||


खचलेल्या यौवनाला आधार देताना, 

प्राेत्साहनाची ऊर्जा पुरवू लागली, 

सामर्थ्याची शक्ती शिकवू लागली, 

ती बहरू लागली ||


चालीच्या ठेक्यावर डोलताना, 

अनुभवाचा पोशाख चढवताना, 

सुविचारांची देवाण घेवाण करू लागली,

ती बहरू लागली ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational