कवी
कवी
भावना नाहीत विशेष कि काय, दर्जा आता ढासळलाय.
सुचतंय खुप पण मांडताना, कवी लेखनी सोबत कोसळतोय.
शब्दांची गुंफनं आता, पहिल्या सारखी होतं नाई.
एकचाल लय वाटनारी सुध्दा, मध्येच पळून जाई.
मग रेटुण लिहिलेलं, रेटुण असंच वाचायचं.
ऐकनाऱ्याच्या कानात, एका हाकेत कसं साठायचं.
त्या साठी निघायला हवेत, खोल मनातून हुंकार.
सूर्या सारखे तेज घेऊन, दूर लोटण्या अंधार.
पण कवी नेतोय कुठं, अनं वाचक जातोय कुठे.
ताळमेळ हा खुप भयंकर, प्रवास जातो तसा पुढे.
तळमळ होते खुप मना, वाटतं मांडव सारं काही पुर्ण.
ऐकनाऱ्याच्या काळजा भिडेल, टवकारतील ते कर्ण.
समाजात जगताना, समाजाचा भाग आहोत याची कल्पना हवी.
लिहिणाऱ्याचं काय, जे आठवतं सुचतं, कल्पना करतो, ते लिहितो कवी.
