कुटुंब
कुटुंब
नातं कसं असावं आणि कसं ते नसावं
जिथे प्रत्येकाने शिकावं तेच कुटुंब असावं
संस्कार घडतात इथेे परंपरांचा राखला जातो मान
मायेच्या पंखांखाली विसरला जातो साऱ्या ताण
वडीलधाऱ्यांना पाहताना वाटतो जिथे अभिमान
त्यांच्या अस्तित्वाने इथे शमते आपली तहान
आदरयुक्त भीती असली तरी विचारांचे स्वातंत्र्य मिळतं
बोलण्याचं बाळकडू आपल्या लोकांमध्येच कळतं
धाडसाचे शिक्षण आणि जिद्दीची पेरणी केली जाते
श्रमाची मशागत शिकवून यशाचे पीक घेतल जाते
कुटुंब नावातच सार काही दडल आहे
अपाा मायेच प्रेम इथच तर जडल आहे
