कुशल सेनानी
कुशल सेनानी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आई जिजाऊच्या पोटी रत्न जन्मला,
साऱ्या राज्यात जल्लोष झाला,
गुणवान किर्तीवान असा राजा झाला,
शिवछत्रपती चा जयघोष झाला.।।।१।।।
पहावे तेवढे विजय मिळविले,
राज्यात रामराज्य आणले,
सुख शांती राज्यात नांदीली,
असा राजा कधी न जाहले.।।।२।।।
स्त्री वर होणारे अत्याचार थांबविले,
मोघलांना वठणीवर आणले,
तलवार तळपली रणांगणावर,
मोगलाईना चांगले ठणकावले.।।।३।।।
युद्धामागून युद्ध केले,
गड किल्यावर किल्ले जिंकले,
शत्रूवर मिळवला विजय,
असे राजे छत्रपती शिवाजी झाले.।।।४।।।
कुशल प्रशासक बुद्धिमान राजा,
नियोजन बद्ध प्रशासन केले,
राजे शिवाजीला शतशः प्रणाम,
राजाधिराज होऊन गेले.।।।५।।।
